Saturday, December 25, 2010

वीजनिमिर्तीसाठी गायी म्हशींचाही हातभार

वीजनिमिर्तीसाठी गायी म्हशींचाही हातभार

27 Feb, 2007, 1833 hrs IST
दिनेश कानजी

आरे म्हटलं की दूध आठवतं. आरे परिसरातील गोठे आणि तबेल्यांत १६ हजार दुभती जनावरं आहेत. या जनावरांच्या शेणाची विल्हेवाट कशी लावायची, हा आजवर आरे प्रशासनासाठी तापदायक ठरलेला विषय. आता या शेणापासून वीजनिमिर्तीच्या विषयावर महाराष्ट्र ऊर्जा विकास मंडळ गंभीरपणे विचार करतंय. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर १ केव्ही विजेची निमिर्ती शक्य होणार आहे. हे प्रमाण फार नसलं, तरी लोडशेडिंगच्या संकटामुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्राला हा 'तिनके का सहारा'ही मोलाचा आहे.

आरे परिसरात दुभत्या जनावरांपासून रोज निर्माण होणाऱ्या सुमारे दीड हजार टन शेणापासून बायोगॅस निमिर्ती करण्याचा प्रकल्प काही वर्षांपूवीर् सुरू करण्यात आला होता. परंतु हा प्रयोग साफ फसला. त्यामुळे शेणापासून वीजनिमिर्तीचा प्रकल्प राबवण्यापूवीर् पुरेसा होमवर्क करण्यात येत आहे. आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरुंधती शेलटकर यांच्यासह सुमारे १५ अधिकाऱ्यांच्या पथकानं नुकतीच पुण्यातल्या 'महाराष्ट्र एनजीर् डेव्हलपमेंट ऑथॉरिटी'ला ('मेडा) भेट देऊन अपारंपरिक ऊजास्त्रोतांबद्दल माहिती घेतली. त्यानंतर पंजाब ऊर्जा विकास मंडळाने लुधियाणा येथे विकसित केलेला शेणापासून वीजनिमिर्तीचा प्रकल्प पाहून त्याचाही अभ्यास केला. हा प्रकल्प आरे परिसरात राबवताना तो आतबट्ट्याचा ठरणार नाही, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

आरेतले शेण सध्या निविदा मागवून विकलं जातं. परंतु ते विकण्यापूवीर् ठेवायचं कुठे, ही एक समस्या आहे. कधी कधी इथल्या खेळण्याच्या मैदानावर हे शेण टाकण्यात येतं. या शेणापासून वीजनिमिर्ती करायची असली, तरी आम्ही अन्य पर्यायांबाबतही चाचपणी करत आहोत, अशी माहिती दुग्धविभागाच्या प्रधान सचिव लीना मेहेंदळे यांनी दिली. त्या म्हणाल्या पंजाबातील शेणापासून ऊर्जानिमिर्तीच्या प्रकल्पासाठी केंद सरकारनं शंभर टक्के अनुदान दिलंय. आरेत असा प्रकल्प उभारायचा, तर अनुदानाची आवशकता लागेलच. कानपूरमध्ये बायोगॅसपासून सीएनजी बनवण्याचा प्रयोग यशस्वी झालाय, तोही आरेमध्ये राबवायला हरकत नाही. पण त्या आधी तो आथिर्कदृष्ट्या परवडणारा आहे का, याचा विचार व्हायला हवा. स्वीडनमध्ये अवघ्या सहा महिन्यापूवीर् बायोगॅसचा वापर करून ट्रेन चालवण्यात आली. असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्या सर्वांचा विचार करून त्यातला फायदेशीर पर्याय निवडायला हवा. आरेच्या शेणाचा प्रश्ान् अशाप्रकारे मागीर् लागल्यास मुंबईतल्या शेकडो तबल्यांमध्ये निर्माण होणाऱ्या शेणाचा प्रश्ान्ही सुटू शकेल. यातलं बरंच शेण नाल्यातून वाहून जातं. नाले तुंबून पावसाळयात मंंुबई पाण्याखाली जाते, त्याचं हे देखील एक महत्वाचे कारण आहे.

No comments: